सिझरीन झालेल्या महिलेला रुग्णालयातून दिले हकलून….

हिंगोली. २८ जुलै २०२०: कोरोनामुळे संपुर्ण राज्यात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर माणसातील माणुसकी देखील आता कुठेतरी लुप्त होत चालली आहे. कोरोना महामारीचा लोकांंवर मानसिक ताण पडतोय. कोरोना व्यतरिक्त रुग्णाची मोठ्या प्रामाणात हाल होताना दिसत आहेत. तर अनेक भागात आजही कोरोना रुग्ण आढळला की त्याच्या बरोबर गैरवर्तन केले जाते.

हिंगोलीच्या वसमत शहरात सिझरीन झालेल्या महिलेचा कोरोना अवहाल पाॅजिटिव्ह आली म्हणून तिला रुग्णालयातून हकलून देण्यात आले. वसमतच्या शासकीय रुग्णालयात ती बाळंतीण झाली होती आणि ५ दिवसानंतर तिचा अहवाल हा पाॅजिटिव्ह आला आणि तिच्या बरोबर असे गैरवर्तन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

या घटनेमुळे कोविड पाॅजिटिव्ह रुग्णांबरोबर वगणारी प्रवृती हि फ्रंन्ट लाईन वाॅरियरच असून माणुसकीला काळीमा फासणारी हि घटना घडली आहे. तर समाजात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाबरोबरच्या या वर्तनामुळे द्वेषचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने महिलेल्या दिलेल्या या वागणुकीमुळे लोकांचे अनेक तीव्र प्रतिसाद पहायला मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा