गोल पोस्ट इतर दबा धरुन बसलेल्या वाघाने घेतला एका युवकाचा बळी

दबा धरुन बसलेल्या वाघाने घेतला एका युवकाचा बळी

चंद्रपूर, २५ ऑक्टोबर २०२२: चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीचे गाव असलेल्या माजरी येथे वाघाच्या हल्ल्यात खाजगी कोळसा कंपणीचे काम करत असलेला एक युवक ठार झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मनूष्यावर हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे.

कधी जंगलात तर कधी शेतात मानवावर हल्ले होतात. पण आता नागरी वस्तीत वाघाचा हल्ला झालाय, या हल्ल्यात ठार झालेल्या कामगाराचे नाव दिपूसिंग असे आहे. तो कंपणीत कामाला होता. सोमवारी रात्र पाळी असल्याने तो त्याच्या न्यु हाऊसिंग कॉलनी येथील घरुन कामावर जात असताना अचानक घरामागून वाघाने त्या युवकांवर हल्ला केला. त्या वाघानं त्याला फरफटत मागील झुडपात नेले. दिपुच्या ओरडण्याच्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोधाशोध सूरु केला. काही वेळानंतर तो झुडपात मृत अवस्थेत दिसून आला.

या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनमध्ये दहशत निर्माण झाली असून वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ताबडतोप कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version