नवी मुंबई, २ नोव्हेंबर २०२२: नवी मुंबईतील कामोठे येथे एक खळबळजनक घटना समोर आलीय. जिथं १७ वर्षीय तरुणाची चाकूनं वार करून हत्या करण्यात आली. प्रकरण पनवेलच्या सेक्टर-१५ चं आहे. जिथं हाऊसिंग सोसायटीत काम करणाऱ्या दोन तरुणांनी एका अल्पवयीनाची हत्या केली. मृताचा गुन्हा एवढाच होता की त्याने आरोपीला त्याच्या वायफाय हॉटस्पॉटचा पासवर्ड देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यानं आधी मृतकाला मारहाण केली आणि नंतर चाकूनं वार करून तरुणाची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई सुरू केलीय.
रवींद्र अटवाल उर्फ हरियाणवी आणि संतोष वाल्मिकी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास तिघेही पान टपरीवर गेले होते. जिथे आरोपींनी मृत व्यक्तीकडून हॉटस्पॉटचा पासवर्ड मागितला. पासवर्ड न दिल्यानं तो संतापला आणि त्यानं मृतकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून मयत व्यक्तीनंही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता दोन्ही आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
रवींद्र हरयाणवी यानं चाकू काढून मृताच्या पाठीत वार केल्यानं हे प्रकरण इतकं वाढल्याचा आरोप आहे. ज्यात तो गंभीर जखमी झाला. तरुणाला घटनास्थळी सोडून आरोपी पळून गेले. आजूबाजूच्या लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं, तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे