दुरुस्तीसाठी डीपीवर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यु

भंडारा, ३सप्टेंबर २०२२: एका शेतकरी तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यु झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी शरद यादो धोटे, राहणार भागडी या ३२ वर्षीय तरुणाला विद्युत डीपीचा शॉक लागून मृत्यु झाला आहे.

वीजपुरवठा खंडीत झाल्याने हा तरुण बिघाड दुरुस्त करण्यासाठी थेट डीपीवरच चढला आणि अचानक शॉक लागल्याने त्यांचा मृत्यु झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सिंचन खोळंबल्याने बिघाड दुरुस्तीसाठी डीपीवर चढने या तरुणाच्या जीवावर बेतले आहे. शरदचे चिचोलि-भागडी शिवारात दोन एकर शेत आहे.

शेत सिंचनासाठी कृषी वीजपंप आहे. शरद नेहमीप्रमाणे पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला. मोटारपंप सूरु करण्याचा प्रयत्न केला,मात्र पंप सूरु न झाल्याने वीज पुरवठ्यात बिघाड झाला असावा, असे त्याला वाटले. यावेळी शरदने डीपीचा वीजपुरवठा बंद केला आणि वर चढला. मात्र काही कळायच्या आत त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.

डीपीवर लटकलेल्या अवस्थेतच त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी घटनास्थळी धाव घेत त्याच्या कुटुंबियांना, महावितरण कंपणीला आणि पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी पंचनामा केला आहे. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा