आमच्याकडे १६५ आमदार: संजय राऊत

मुंबई: आज सकाळी दहा वाजता एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, “आमच्याकडे १६५ आमदार आत्ता च्या क्षणाला आहेत. याआधी मी १७० चा आकडा सांगितला होता परंतु त्यातले पाच आमदार सध्या गायब आहेत काही अवधी नि ते पुन्हा येतीलही.”
पुढे ते म्हणाले की, “अजित पवार यांच्यासोबत पंधरा ते वीस आमदार जरी असले तरी त्यातील सर्व आमदार परत पवारांकडे आले आहेत. अजित पवार यांच्याकडे जास्तीत जास्त पाच ते सहा आमदार असतील. या पाच ते सहा अंधारावर भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रीपद देव केले. मी भाजपला राजकारणातील चांगला व्यापारी समजत होतो परंतु भाजपने तेही चुकीचे सिद्ध केले.”
शरद पवार हे लोकनेते आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनता शरद पवारांसोबत आहे. लवकरच आम्ही महाआघाडीचे सरकार स्थापन करू. राज्यपालांनी भाजपला आठ दिवस दिले होते तर आम्हाला केवळ २४ तास देण्यात आले होते. त्यांनी राज्यपालांना टोला लगावत म्हणाली की,” राज्यपाल हे आम्हाला देवासारखे आहेत हो त्यांनी असे कृत्य करावे हे न पटणारे आहे त्यांच्या नावातच देव हा शब्द आहे.”
एकूणच पाहता भाजपने खेळलेला डाव त्यांच्यावरच उलटून शकतो का हा मोठा प्रश्न आहे. न्यायालय यावर काय निकाल देते याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा