आधारतीर्थला आधाराची गरज

राज्यात सध्या सर्व ठिकाणी कडकडीत बंद आहे.त्यामुळे प्रत्येकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यातच नाशिकचे त्र्यबंकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा संचार होतोय त्यामुळे तेथील मुले भयभयीत झाले आहेत.

लाॅकडाऊन मुळे जंगलतील प्राणी हे पाण्यासाठी व अन्नासाठी मानवी वस्ती मध्ये शिरकाव करतायत. नाशिक येतील आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या मुलांचे आधारतीर्थ आश्रम आहे. निराधार मुलांना आधार देणाऱ्या या आश्रमात ६ महीन्यांपासून ते १५ वयोगटातील ४०० ते ५०० मुलं आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या आश्रमाच्या आवरात एक बिबट्या मुक्तपणे संचार करतोय ज्या मुळे मुलांमध्ये भीतीचे सावट आहे.

आश्रमात धान्यसाठा ही ८ दिवस पुरेल इतकाच आहे व या परिस्थितीमुळे तेथील संचालकांनाही बाहेर पडता येत नाहीये. तरीही मुलांचा उदनिर्वाह हे तेथील संचालक व कार्यवाहक कशीबशी पार पाडत आहेत.

‘न्यूज आनकट’च्या माध्यमातून आम्ही अव्हान करतोय कि शक्य तितकी मदत तुम्ही करा त्यांचा अकांऊट नंबर व संपर्क क्रमांक आमच्या स्क्रिनवर देत आहोत.

बँकेचा तपशील:

श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट/
आधार तिर्थ आश्रम

बँकेचे नाव: एच.डी.एफ.सी. बँक

खाते क्रमांक: १२४६७६२०००००१६

आयएफसी कोड: एचडीएफसी ०००१२४६

(एन ई एफ टी) शरणपूर रोड,
नाशिक- ४२२००२

दूरध्वनी: ९६२३५२१२०२/९४२०४६४५५३

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा