सोशल मीडियाची आधार जोडणार नाही

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी सोशल मिडीया अशी आधार कार्ड लिंक करणे याविषयी चर्चा जोरात सुरु झाली होती. न्यायालयानेही सरकारला या बाबत नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. परंतु काही जणांकडून या नियमा साठी विरोध करण्यात आला होता.
सोशल मीडियाचा आधार जोडण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. आधार सोशल मीडियाशी जोडण्यासाठी सरकार कायद्या करण्याचा विचार करीत आहे का या प्रश्नावर प्रसाद यांनी ही माहिती दिली. लोकसभेत बोलताना प्रसाद म्हणाले की, सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तीचे आधार त्याच्या सोशल मीडिया खात्याशी जोडण्या संबंधी कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारसमोर नाही. प्रत्येकाची आधार शी संबंधित सर्व माहिती सुरक्षित आहे माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६९ अ अंतर्गत सरकार कडे जनहितासाठी सोशल मीडियावरील खाती बंद करण्याचा अधिकार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा