गोल पोस्ट महाराष्ट्र अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधम गजाआड….

अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधम गजाआड….

पाथरी (सावली), दि. १९ जुलै २०२०: सावली तालुक्यातील पाथरी येथे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका ४५ वर्षीय नराधमाने अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचार झाल्याच्या घटनेनं चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी पीडित चिमुरडी घराबाहेर खेळायला गेली होती. काही वेळानंतर ती रडत घरी आली. आईने चौकशी केली. तिला संशय आल्यानं तिनं मुलीला ग्रामीण रुग्णालयात नेलं. तिची तपासणी केली. वैद्यकीय तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचं निदान केलं. आईने तडक पाथरी पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपीविरोधात गुन्हा देखील नोंदविला त्यानंतर पोलिसांनी घटनेची गांभीर्य परिस्थिती लक्षात घेता पथके तयार करुन त्या नरधमाला गजाआड केले आहे.

जितेंद्र रामदास मेश्राम असं आरोपीचं नाव असून पाथरी पोलीस स्टेशनमध्ये बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत तसेच कलम ३७६, अ, ब सह कलम ४, ६, १० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या घटनेची माहिती होताच संपूर्ण गावात तीव्र पडसाद उमटले लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामास कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व पाथरीवासीय नागरिक करीत आहेत.याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version