गोल पोस्ट इतर माहिती “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” वरुन वाद

“आज के शिवाजी नरेंद्र मोदी” वरुन वाद

पुणे : भारतीय जनता पक्ष्याच्या दिल्ली कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या सांस्कृतिक संमेलनात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकावरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेनं सडकून टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून भाजपावर टीकेची झोड उठवली जात आहे. सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला आहे.
“शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली. हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?,” असा प्रश्न राऊत उपस्थित केला आहे. सोबतच यावरून जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजप, असं म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली.

मात्र या सगळ्या गदारोळावर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त करत उदयनराजे म्हणाले, या पुस्तका संदर्भात मी सविस्तर माहिती घेईल, कोण काय बोलतोय हे पाहतोय आणि यानंतर माझी भूमिका माध्यमांसमोर लवकरच मांडेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे सर्वजण वागले तर देशात सध्याची जी काय परिस्थिती आहे जी अराजकता आहे ती राहणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही भाजपवर टीका केली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांना स्वराज्यात सामावून घेतले. शेतकऱ्यांच्या पिकालाही धक्का लागू दिला नाही, गोरगरिबांना आधार दिला. जनतेसाठी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही. सह्याद्री एवढ्या माझ्या राजाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा, नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे, असा इशाराच पाटील यांनी भाजपला दिला.
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली.

error: Content is protected !!
Exit mobile version