आज मराठी रंगभूमी दिन

आज 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.1. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली.

2. 1843 मध्ये सांगली येथे मराठीतल्या ‘सीता स्वयंवर’ पहिल्या गद्य व संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली.

3. 1943 मध्ये सांगलीत 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करून अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीही स्थापण्यात आली.

4. रंगभूमी दिनानिमित्त मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात येते.

5. पुरस्काराचे स्वरुप : गौरवपदक,11 हजार रोख व स्मृतिचिन्ह

एवढ्या कलाकारांना आत्तापर्यंत मिळाला पुरस्कार : अमोल पालेकर, केशवराव दाते, ग.दि. माडगूळकर, छोटा गंधर्व, डॉ.जब्बार पटेल, जयंत सावरकर, ज्योस्ना भोळे, दाजी भाटवडेकर, दिलीप प्रभावळकर, दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर, पु.श्री.काळे, फैयाज, बापूराव माने, बालगंधर्व, भालचंद्र पेंढारकर, महेश एलकुंचवार, माधव मनोहर, मामा पेंडसे, मास्टर कृष्णराव, रत्नाकर मतकरी, रामदास कामत, वसंत कानेटकर, विश्राम बेडेकर, शरद तळवलकर, शं.ना.नवरे, हिराबाई बडोदेकर, मोहन जोशी.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा