आज पहिलं राफेल भारताला मिळणार

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज पॅरिसला जाणार आहेत. तिथे वायु सेना दिनाला भारताला पहिलं राफेल लढाऊ विमान मिळेल.
   उद्या दसरा असल्याने तिथे रजनाथ सिंह राफेल हँड ओव्हर सेलिब्रेशन दरम्यान शस्त्र पुजाही करणार असल्याचं कळतंय. हा कार्यक्रम दक्षिण फ्रान्सच्या बॉगदू शहरात आयोजित करण्यात आला आहे.
   संरक्षणमंत्री यावेळी राफेल विमानात उड्डाण करतील. त्यांच्यासोबत आणखी तीन राफेल फायटर्स उड्डाण घेतील.
  भारताला राफेल विमानांसोबत सर्वात अ‌ॅडव्हान्स शस्त्रही मिळतील. यामध्ये Meteor आणि Scalp मिसाईल्‍स असतील, असं युरोपियन मिसाइल निर्माता MBDA ने सांगितलं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा