आज पुण्यात साध्या पद्धतीने होणार मानाच्या गणपतींचे विसर्जन

पुणे, १ सप्टेंबर २०२०: आज आपल्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. ढोल-ताशांच्या गजरात अगदी वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो. पण, आता कोरोनाच्या काळात बाप्पाला अतिशय साध्या पद्धतीत निरोप दिला जाईल. अनंत चतुर्थीच्या दिवशी पुणे-मुंबईत कस वातावरण असतं हे सांगण्याची गरज नाही. मात्र यंदा चित्र पूर्ण वेगळा आहे. पुण्यातील गणेश विसर्जनाची ख्याती पूर्ण देश व जगभरात पसरलेली आहे. मात्र यंदा कोरोना संकटामुळे पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुका अतिशय साध्या पद्धतीने निघणार आहेत.

७ हजार पोलिस तैनात

‘पुणे शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या चार रस्त्यांवर यंदा पूर्वीप्रमाणे बंदोबस्त राहणार नाही. तरीही नागरिकांनी दर्शनासाठी बाहेर पडू नये म्हणून ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तसेच, घाट व नदीपात्रातदेखील पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. सात हजार पोलिस, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, ‘एसआरपी’ची कंपनी बंदोबस्तामध्ये असेल.

असा असेल पुण्याच्या मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा

१) परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी १०.३० वाजता श्री कसबा गणपतीला हार घालतील

२) सकाळी ११.३० वाजता पहिला मानाचा कसबा गणपतीचे विसर्जन होईल.

३) दुसरा मानाच्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी १२.१५ वाजता,

४) तिसरा मानाचा गुरुजी तालीमचा गणपती दुपारी १ वाजता,

५) चौथा मानाचा श्री तुळशीबाग गणपती दुपारी १.४५ वाजता,

६) पाचवा मानाचा केसरी वाडा गणपती दुपारी २.३० वाजता,

७) श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दुपारी ३.१५ वाजता,

८) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, ६:४७ वाजता

९) अखिल मंडई मंडळाचा गणपती सायंकाळी ७ वाजता विसर्जन होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा