आज संपुष्टात येणार सध्याच्या शतकातील सर्वात मोठी गनिमी खेळी !

मुंबई: अल्प माताचे सरकार स्थापन करायचे नाही ही भाजपची भूमिका आहे तर दुसरीकडे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा हट्ट शिवसेनेकडून लावून धरण्यात आला आहे. या सर्व मध्ये राज्यातील सत्ता स्थापनेला दिरंगाई होत आहे. बघता बघता आज सत्ता स्थापनेबाबत शेवटचा दिवस येऊन ठाकला आहे.
सत्ता स्थापनेचा पेच अजून बिकट बनत चालला आहे आणि राज्याची पावले राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चालली आहेत. जर आज महायुती सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरत असेल तर सरकारला राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतर राज्यपाल सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देतील. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्यात येईल.
शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना वांद्र्याच्या रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले आहे. आईन वेळेला आमदारांचा होणाऱ्या दगाफटका टाळण्यासाठी त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देणार असेल तरच फोन करा असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर दुसरीकडे आमदारांचा दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेस आपल्या आमदारांना जयपूरला हलवत आहे. फोडाफोडी च्या बाबतीत भाजप अव्वल असण्याची टीका काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केली. भाजपनेही आपल्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये येण्याचे आव्हान केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा