मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ४ ज्यात कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. आज दैनंदीन कामातही अडथळ्यांची शर्यत असेल. गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.
वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५ कुणी आज पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले म्हणून लगेच तुम्ही लढायला जावू नका. आज स्वत:च्या मर्यादा ओळखून वागणेच तुमच्या हिताचे असेल.
मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : २ जोडीदाराच्या खंबीर साथीने कोणत्याही अडचणी सहजच सुटतील. प्रवासास निघाला असाल तर मात्र आज थोडासा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ तब्येतीच्या क्षुल्लक तक्रारींकडेही दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे आज कोणतेही निर्णय उतावीळपणे घेऊ नका. मंगलकार्याची बोलणी उद्यावरच ढकला.
सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६ कवींना रोमँन्टीक काव्य सुचतील. गृहीणी आज पार्लर्ससाठी आवर्जुन वेळ काढतील. बऱ्याच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल.
कन्या : शुभ रंग : मरून| अंक : ४ बिल्डर्स, कंत्राटदार व दलाल यांच्यासाठी अनुकूल दिवस. जागेच्या खरेदीसाठी कर्जमंजूरी होईल. आज ज्येष्ठ मंडळींना दम्याचे विकार त्रस्त करतील.
तूळ : शुभ रंग : क्रिम| अंक : ७ नोकरीत कंटाळवाणी कामे करावी लागतील. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल. काही कारणांसाठी मातोश्रींची नाराजी पत्करावी लागेल.
वृश्चिक : शुभ रंग : पिवळा| अंक : ३ कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. आज आर्थिक बाजूही चांगली असेल. अती स्पष्ट बोलून आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे.
धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९ रिकाम्या चर्चेून वादविवाद होतील. आज वैवाहिक जिवनात जोडीदाराचे वर्चस्व मान्य करणे हिताचे राहील. व्यवसायात भागिदारांना विश्वासात घ्यावे लागेल.
मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २ काही आवाक्या बाहेरचे खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. जमाखर्चाचे बजेट विस्कळीत होईल. घरात थोरांशी मतभेद होतील. त्यांच्या वयाचा मान राखाल.
कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : १ व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ पदरात पडेल. दूरावलेले आप्तस्वकिय जवळ येतील. मनोकामना पूर्ण होतील.
मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८ ध्येयप्राप्तीसाठी थोडी सकारात्मकता वाढवावी लागेल. कामाचे तासही वाढवावे लगतील. सुसंवादाने प्रश्न सोपे होतील. गृहीणींनी क्षुल्लक गोष्टी विसरुन जाणे हिताचे.
मिथुन राशीचे खरोखर आहे वाटते आज