आजचे राशिभविष्य

Horoscope icons

मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४ नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल.कितीही राबलात तरी आज वरीष्ठांचे समाधान होणे कठीण.वडीलधाऱ्या माणसांची मने सांभाळावी लागतील.


वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ३ आज फक्त नाकासमोर चालावे असा दिवस. इतरांच्या भानगडीत न डोकावता आज फक्त आपल्या कामाशी कर्तव्य ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या झटकून टाका.


मिथुन : शुभ रंग : तांबूस | अंक : १ कार्यक्षेत्रात महत्वाचे करार मदार यशस्वी होतील. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने योग्य व्यक्ती संपर्कात येतील.विवाह विषयक बोलणी सकारात्ककपणे पार पडतील.


कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ६ दुखणी आंगावर काढू नका. काही जुने आजार दार ठोठावण्याची शक्यता आहे. क्षुल्लक गोष्टीवरून आज मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.


सिंह : शुभ रंग : मरून| अंक : २ आज तुम्हाला आपला एखादा छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. काही रसिक मंडळी तर काम साेडून छंदास प्राधान्य देतील. तरूणांच्या मनात प्रेमांकूर फुलतील.


कन्या : शुभ रंग : पिवळा| अंक : ४ प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या कामातील विघ्नं दूर होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील. गर्भवतींनी तब्येतीची काळजी घ्यावी.


तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १ भावना व कर्तव्य याचा मेळ घालणे कठीण जाईल. महत्वाकांक्षांच्या आहारी जाताना आपल्या मर्यादाही ओळखणे गरजेचे आहे. गृहीणींना माहेरची ओढ लागेल.


वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ५ आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल.


धनू : शुभ रंग : राखाडी| अंक : ७ आज तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहील. आपला मोठेपणा सिध्द करण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल.


मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८ आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांना घरापासून लांब कामाच्या संधी येतील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च वाढणार आहे.


कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६ व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या.


मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९ व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. अहंकार टाळून हितसंबंध जपणे गरजेचे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा