आजचे राशिभविष्य

राशिनुसार, जाणून घ्या असा राहील आजचा दिवस…


मेष: शुभ रंग : लाल | अंक : २ घरात आधुनिक सुख-सुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील. नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.


वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ६ आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृह सौख्याचा दिवस असून कुटुंबियांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.


मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.


कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.


सिंह : शुभ रंग : हिरवा| अंक : ४ आवक मनाजोगती असल्याने मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.


कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६ टेलिफोन व लाईट बिले भरावी लागणार आहेत काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. डोळ्यांची निगा राखा.


तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७ जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता.


वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ३ नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे.वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.


धनू : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८ नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकललेली बरी. शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.


मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २ नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.


कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९ ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.


मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : १ रुग्णांनी पथ्य पाळण्याची काळजी घ्यायला हवी आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा