आजचे राशिभविष्य

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ८

आज प्रिय आप्तस्वकीयांसह मौजमजेत दिवस व्यतित होईल. जोडीदारास आज एखादे सरप्राईझ गिफ्ट द्याल. तुम्हाला आमच्याकडून दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा.


वृषभ: शुभ रंग : चंदेरी | अंक : १

नोकरदारांना वरीष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. कार्यक्षेत्रात पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.


मिथुन : शुभ रंग : केशरी | अंक : ५

प्रचंड उत्साहात आज दिवसाची सुरवात होईल. आज अनपेक्षितपणे तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीचा कॉल येईल. ही दिवाळी तुम्हाला अत्यंत भरभराटीची जावो.


कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : २

आज तुमच्या राशीच्या चतुर्थात आलेला दिवाळी पाडवा तुमच्या गृहसौख्यात वृध्दीच करणार आहे. मागण्या पूर्ण झाल्याने बच्च्चे कंपनी अत्यंत खूष असेल.


सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : १

काही रसिक मंडळी आजच्या पाडव्याला सहकुटुंब एखाद्या सहलीचे बेत आखतील. आज खिशात पैसा खेळता राहील. गृहिणी मौल्यवान खरेदी करतील.


कन्या : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३

आजचा दिवाळी पाडवा तुमच्या राशीच्या धनस्थानी आला असल्याने तुमच्या धनाची वृध्दीच करणार आहे. गृहीणींना काटकसर करण्याची गरज नाही.


तूळ : शुभ रंग : पिवळा | अंक : ५

आज तुम्ही आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. काही अपूऱ्या स्वप्नांची पूर्तता झाल्याने गृहलक्ष्मी प्रसन्न असेल. विश यू हॅप्पी दिवाली.


वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ९

मनसोक्त खर्च केलात तरी आज पैशाची कमतरता भासणार नाही. काहीजण सहकुटुंब प्रवासाचा आनंद घेणार आहेत. तुम्हाला दिवाळी सुखसमृध्दीची जोवो.


धनू : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४

तुमच्या राशीच्या लाभात आलेला दिवाळी पाडवा तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करणार आहे. प्रिय मित्रांच्या सहवासात आजची संध्याकाळ व्यतीत कराल.


मकर : शुभ रंग : अबोली | अंक : ६

व्यावसायिक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. अर्धवट उपक्रम नव्यानेे सुरु करता येतील. हि दिवाळी तुम्हाला आनंदाची व भरभराटीची जावो.


कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : ८

तुमच्या राशीच्या भाग्यस्थानी आलेला दिवाळी पाडवा नक्कीच तुमच्या भाग्याची वृद्धी करणारा ठरेल. प्रकृती ठणठणीत असल्याने तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील.


मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. सणासुदीस कुटुंबासाठी वेळ काढणे अवश्यक राहील. तुम्हाला दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा