आजचे राशिभविष्य

शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी दिवसाची सुरुवात पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात होत आहे. आजच्या दिवशी काहींना मानसिक स्वास्थ लाभेल. तर काहींना आर्थिक चढउताराला सामोरे जावे लागेल. मनःशांतीसाठी आज कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंब किंवा जोडिदाराला विचारात घेण्यास विसरू नका. १२ पैकी ५ राशींसाठी आजचा दिवस खास आहे, तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.


मेष: शुभ रंग : भगवा | अंक : २ आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. स्वत:ची हौस भागवण्यासाठी खर्च कराल.


वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : १ व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.


मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : २ काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील. नोकरीत अधिकारी वर्ग आपल्यावर खूष आहेच या भ्रमात राहू नका. वरीष्ठ आज गोड बोलून राबवून घेणार आहेत.


कर्क : शुभ रंग : केशरी | अंक : ८

विविध मार्गाने आलेला पैसा जाण्यासाठी विविध मार्ग तयार अाहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज कोणतेच धाडस नको…


सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २

रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. वैवाहिक जिवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे. सहपरिवार चैन व मनोरंजनास वेळ द्याल.


कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ९ आज तुमची तब्येत काहीशी नरमच राहील. नोकरीत सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद संभवतात.


तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ५ पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. गैरसमजाने दूरावलेली नाती जवळ येतील.


वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६ आज कौटुंबिक कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.


धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७ सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.


मकर : शुभ रंग : मोतिया | अंक : ३ नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल.


कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : १ सरकार दरबारी रखडलेली काही कामे मार्गी लागतील. कर्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा तसेच कतृत्वाचाही प्रभाव राहील. आज जोडीदाराशी संगनमत राहील.


मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : २ आज तुमच्या हातून वडीलधाऱ्यांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी होईल. नेते मंडळींना दौरे लाभदायक ठरतील. आरोग्यासाठी खर्च संभवतो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा