आजचे राशिभविष्य

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ७ सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा.जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे.कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. शत्रू माघार घेतील.

वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६ नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मिथुन : शुभ रंग : तांबडा | अंक : ९ घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. कामधंद्यातील अडचणी मानसिक स्वास्थ्य बिघडवतील. एकांत हवासा वाटेल.

कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ३ विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होण्याची शक्यता आहे. मोठया उलाढाली टाळलेल्या बऱ्या. स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.

सिंह : शुभ रंग : राखाडी| अंक : ७ व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ८ कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६ कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. विद्यार्थ्यांना सुयश.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. आज प्रेमप्रकरणांत मात्र नसती आफत होईल, सांभाळा.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : २ आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४ पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ३ स्वभावातील अहंकारामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लीष्ट कामेही सोपी होतील.

मीन : शुभ रंग : निळा | अंक : ५ कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. काही बिले भरावी लागतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा