आजचे राशिभविष्य

मेष- शुभ रंग : मोरपंखी, अंक-१

आज कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. कलाक्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा नावलौकिक होईल. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ मजेत जाईल.


वृषभ- शुभ रंग: गुलाबी अंक-७

आर्थिक आवक पुरेशी असून परिवारात सामंजस्याची भावना राहील. आज विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील.


मिथुन – शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक- ९

महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. कार्यक्षेत्रात दगदग व धावपळ वाढेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी चालून येतील. शेजारी सलोखा राहील.


कर्क – शुभ रंग : सोनेरी, अंक- ७

पैसा येण्याचे विविध मार्ग खुले होतील. रखडलेली देणी देता येतील. नवे उपक्रम कार्यान्वित होतील. वाणीत मृदुता ठेऊन इतरांस कामास लावता येईल.


सिंह – शुभ रंग : भगवा अंक-८

चैन करण्यासाठी पैशाची उधळपट्टी होईल. स्वत:चे लाड पुरवण्यास प्राधान्य द्याल. आज वादविवादात आपलेच घोडे पुढे दाटवण्याचा प्रयत्न कराल.


कन्या – शुभ रंग : जांभळा, अंक-६

कलाकारांचा परदेशी गौरव होईल. भविष्याच्या दृष्टीने योग्य गुंतवणूक कराल. कर्जप्रस्ताव लांबणीवर पडतील. महत्वाच्या चर्चेत समोरच्याचे ऐकून घ्या.


तूळ – शुभ रंग : चंदेरी, अंक, -८

कार्यक्षेत्रात असलेले वर्चस्व टिकून राहील. नोकरीच्या ठीकाणी बढतीचे मार्ग मोकळे होतील. अपेक्षा वाढतील. रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल.


वृश्चिक – शुभ रंग: राखाडी, अंक- २

नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांचे दडपण राहील. योग्यवेळी अधिकार वापरावे लागतील. स्वावलंबन हिताचेे राहील. आज मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत.


धनू – शुभ रंग: पिवळा, अंक-३

आज कुणाकडून सहकार्याची अपेक्षा नको. विरोधक सक्रीय असताना नोकरीतील कामात चूका करुन चालणार नाही. मानसिक शांतीसाठी नामस्मरण गरजेचे.


मकर – शुभ रंग : आकाशी, अंक-१ काही मानअपमान पचवावे लागणार आहेत. डोके शांत ठेवा. दिवस तितकासा अनुकूल नसल्याने फार मोठी रिस्क नकोच. कुणालाही सल्ले देणे टाळा.


कुंभ – शुभ रंग : भगवा, अंक- ५

आज समोरची व्यक्ती तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रभावीत होईल. चांगल्या घटनांनी मनोबल वाढेल. आज जोडीदारास एखादे सरप्राइझ गिफ्ट द्याल.


मीन- शुभ रंग : निळा, अंक, -४

काही येणी असतील तर भिडस्तपणा न बाळगता मागीतलीत तर वसूल होतील. तब्येतीच्या किरकोळ तक्रारींसाठी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा