अखेर ‘लालपरी’ जिल्हाबंदी ओलांडणार

मुंबई, १९ ऑगस्ट २०२०: गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसामान्य जनतेची लाडकी लालपरी हि कोरोनामुळे ठप्प पडली होती. तर आता सर्वसामान्य जनतेची प्रवासाची होणारी तारांबळ लक्षात घेता राज्य सरकारने एसटी बाबत एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत एक परिपत्रक जारी केले असून राज्यातील एसटी सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लाॅकडाऊन काळात लालपरीला दिवसागणिक २२ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन या तत्वानुसार जिल्ह्यांतर्गंत वाहतूक सुरू करण्यात आली होती. पण तरी देखील क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊनच वाहतूक करावी लागत होती. तास-दीड तासात मिळेल, तेवढे प्रवासी घेऊन एसटी मार्गस्थ होत होती. मार्गात कुठेही थांबायचे नसल्याने थेट प्रवासी घेऊन एसटी निघत आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे. त्यातच, आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात येत होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा