आळेफाटा येथे तालुकास्तरीय कुस्ती निवड चाचणी

आळेफाटा : पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीने आळेफाटा येथील संभाजीराजे कुस्ती संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती तालुकास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परीषद सदस्य शरद लेंडे पं समिती सदस्य जीवन शिंदे, माजी जिल्हा परीषद सदस्य माऊली कुऱ्हाडे, प्रसन्ना डोके, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सचिव बाळासाहेब गुंजाळ, जी.एल गुंजाळ, कुस्तीगीर संधटनेचे संचालक विलास कदम, तालुका अध्यक्ष जगन कोर्हाळे, तालुका क्रिडा संघटना अध्यक्ष रमेश राऊत, संजय गुंजाळ, बाळासाहेब कुऱ्हाडे, दत्ता गावडे आदी उपस्थित होते.
या कुस्ती स्पर्धेत विविध गट व वजन गटातील विजेते या प्रमाणे
◆बाल गट- शूभम शिंदे अथर्व खतोडे सौरभ शिंदे समर्थ गुंजाळ संकेत चिकणे

◆कुमार गट – सौरभ शिंदे तान्हाजी फुलमाळी गुरुनाथ चव्हाण मयूर गाडेकर साहील शिंदे देविदास गाडेकर मनोज माळवकर

◆वरीष्ट गट – नारायण बो-हाडे अरुण गवारी कपील रणदिवे किरण नलावडे सुरेश काकडे राहूल फुलमाळी अनिकेत डावखर. हे विजेते झाले आहेत. त्यांची जिल्हा पातळीवरील कुस्तीसाठी निवड झाली आहे.

या विजेते व उपविजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. बक्षिस वितरण शरद सोनवणे अमित बेनके, प्रसन्ना डोके उद्योजक भास्कर गाडगे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे संचालक विलास कदम, तालुका अध्यक्ष जगण कोर्हाळे, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटोळे, कार्याध्यक्ष जालींदर ढमाले, संचालक आशिष फुलसुंदर, दगडू अस्वार, संतोष मस्करे, विलास पाटे, प्रकाश कबाडी, पांडूरंग गाडेकर, संतोष शिंदे यांनी केले.
पंच म्हणून बाळासाहेब भालेराव व सचिन मुंढे यांनी काम पाहिले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा