विधानपरिषद निवडणुकीत प्रथमच आम आदमी पक्ष मैदानात!

मुंबई, १५ जानेवारी २०२३ : गोवा, गुजरात निवडणुकांनंतर सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले असून, विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक व अमरावती, नाशिक पदवीदर अशा तीन मतदारसंघांतील अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.

राज्यात नागपूर, कोकण व मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, तर अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघ अशा ५ जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक होत असून, यानिमित्ताने विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात आम आदमी पक्ष प्रथमच उतरला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रा. देवेंद्र वानखेडे यांना पुरस्कृत करून त्यांना ‘आप’ने एबी फॉर्म दिला आहे. याचबरोबर अमरावती पदवीधर मतदारसंघातून डॉ. भारती दाभाडे यांना पाठिंबा दिला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून ईश्वर पाटील यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती ‘आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी दिली. नवव्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून आम आदमी पक्षाला मान्यता मिळाली आहे. दिल्लीत ६२, पंजाबमध्ये ९३, गुजरातला ५, तर गोव्यात २ आमदार असे सध्याचे बलाबल आहे. महाराष्ट्रात ‘आप’चे एकूण १७५ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा