मुंबई: शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते. आम्ही दिवसाढवळया राजकारण करतो. आमच्याकडे रात्रीस खेळ चालेचे राजकारण चालत नाही, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर टीका केली.
हा केंद्राने महाराष्ट्रावर केलेला सर्जिकल स्ट्राइक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहील आणि आम्ही पुढची दिशा ठरवू असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आधी ईव्हीएमचा खेळ सुरु होता. आता नवीन खेळ चालू आहे. आता निवडणुकीची गरज उरली आहे असे मला वाटत नाही. विश्वासघात झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले हे सर्वांना ठाऊक आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपाच्या मी पणा विरुद्ध ही लढाई आहे. पाठित खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करु नका. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा तसा हा महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राइक आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.