आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व महेश दादा सातव नवरात्र उत्सव यांचे कॅलेंडर प्रकाशनाचा कार्यक्रम विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते कॅलेंडर प्रकाशन व २६० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मराज मेहेत्रे तसेच या प्रसंगी विद्यमान नगरसेवक व माजी महापौर श्री प्रशांत दादा जगताप, श्री योगेश जी ससाने, नगरसेविका नंदाताई लोणकर, माजी नगरसेवक फारुक नाना इनामदार हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नारायणाची लोणकर, महिला अध्यक्ष पुनम ताई पाटील, स्वीकृत नगरसेवक मनोज घुले, सागर राजे भोसले, अविनाश काळे, सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे, संजय घुले, दिपालीताई कवडे, अश्विनीताई चोरघडे, योगेंद्र गायकवाड शिवा भाऊ शेवाळे, दत्तात्रय घुले हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय शिंदे (मा.पंचायत समिती सदस्य) यांनी केले व आभार प्रदर्शन राजन नायर यांनी केले.
कॅलेंडर प्रकाशित झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्यासाठी संगीत खुर्ची हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी हांडेवाडी रोड तसेच मोहम्मद वाडी रोड परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच महेश दादा सातव नवरात्र उत्सव चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सातव नगर परिसरातील सर्व मित्र परिवार यांनी केले.











































