गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा आमदार दत्तात्रय भरणे राज्यमंत्री झाल्याने इंदापूर तालुक्यात जल्लोष

आमदार दत्तात्रय भरणे राज्यमंत्री झाल्याने इंदापूर तालुक्यात जल्लोष

इंदापूर : राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
अजित पवार यांचे निकटवर्तीय व अजित पवार यांचे राजकारणातील कट्टर वैरी असलेले हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा विधानसभेमध्ये पराभूत करून पाटील यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे. अशा दत्तात्रय भरणे यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले आहे. भरणे हे धनगर समाजाचे नेते म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे धनगर समाजातही उत्साहाचे वातावरण दिसून येतेय.
इंदापूर तालुक्याच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेसला दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले आहे.आज मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, पेढे वाटत, हलग्याच्या निनादात जल्लोष साजरा केला .

error: Content is protected !!
Exit mobile version