आम्ही एक इंचही जागा देणार नाही : येडियुरप्पा

19

कर्नाटक : महाराष्ट्र व कर्नाटकला कोणता भाग देण्यात आला हे महाजन आयोगाने सांगितल्याप्रमाणे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादामुळे तणाव वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि कर्नाटक परिवहन मंडळाने आपापली प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगावमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यामुळे शिवसैनिकांनी कोल्हापुरात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला होता. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाली होती.

कोल्हापुरात शिवसेनेने पाटील याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती. याचे पडसाद कर्नाटकात उमटले व कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले.त्याला प्रत्युत्तर म्हणून रविवारी कोल्हापुरात शिवसेनेने निषेध मोर्चा काढत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्याचे बसस्थानक परिसरात दहन केले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा