Who is Gauri Spratt : बॉलीवूड स्टार अमिर खान नेहमीच सोशल मिडियावर आणि चाहत्यांच्या चर्चेत असतो. १३ मार्च रोजी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अमीर खानने त्याच्या नवीन प्रेयसीची माध्यमांसमोर ओळख करून दिली. गौरी स्प्रेटा असे त्याच्या नवीन प्रेयसीच नाव असून ते मागील २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात .त्याचबरोबर आम्ही १८ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत असे अमिर खानने सांगितल. त्यामुळे अमिरने चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का दिला आहे. अमिर खानने गौरी स्प्रेटाची मीडियासमोर ओळख दिल्यापासून इंटरनेट आणि सोशल मिडियावर तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उसतुकता लागली आहे. जाणून घेऊया बातमीतून.
गौरी स्प्राट ही मूळची बेंगळुरूची असून तिने तिचे बहुतेक आयुष्य त्याच शहरात घालवले आहे. गौरी ही रीता स्प्राट यांची मुलगी आहे, ज्यांचे बेंगळुरूमध्ये एक सलून होते. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, गौरीने ब्लु माऊंटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याचबरोबर तिने २००४ मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफी हा फॅशन कोर्स केला आहे. प्रोफाइलनुसार, ती सध्या मुंबईत बीब्लंट सलून चालवत असून सूत्रानुसार, तिला सहा वर्षांचा एक मुलगा आहे.
अमिर खानने मिडियाला त्याच्या नात्याबद्दल गुपित माहिती संगितली आहे. तो म्हणाला की, “एक तर, ती बंगळुरूमध्ये राहते म्हणून, मी तिला भेटण्यासाठी विमानाने जायचो करण तिथे मिडियाची तपासणी जास्त नसते. त्यामुळे आमच्या नात्याबद्दल कोणाला जास्त माहिती मिळू शकली नाही.” ‘याचबरोबर (आप लोग मिस कर देते हो ) माझ्या घराकडे तुमच लक्ष नाही.’ असे अभिनेता अमिर खानने मिडियाला सांगितले.
अलिकडेच, आमिर खानने गौरीची ओळख आपल्या मुलांशी, कुटुंबाशी आणि जुने मित्र शाहरुख व सलमान खानशी करून दिली. १२ मार्च रोजी सलमान खान आणि शाहरुख खान अभिनेत्याच्या घरी त्याच्या प्रेयसीला भेटायला गेले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर