गोल पोस्ट स्पॉटलाइट आमिर खानच्या मुलीचा झाला साखरपुडा, बॉयफ्रेंड नुपूर ने हटके अंदाजात घातली लग्नाची...

आमिर खानच्या मुलीचा झाला साखरपुडा, बॉयफ्रेंड नुपूर ने हटके अंदाजात घातली लग्नाची मागणी

मुंबई, २३ सप्टेंबर २०२२ : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याची मुलगी आयरा खान सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेचा भाग बनली आहे. स्टारकिड असूनही ती बॉलीवूडच्या प्रकाश झोतापासून लांब राहणे पसंत करते. तिने नाट्यदिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ती सोशल मीडियावरखूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत असते. नुकताच तिने एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे तिला अतिशय रोमँटिक अंदाजा मध्ये प्रपोज करताना दिसत आहे. रियाला प्रपोज केलेल्या व्हिडिओमध्ये फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे आयरा कडे येताना दिसतो, मग नुपूर गुडघ्यावर बसून फिल्मी अंदाजात अंगठी काढतो आणि लेडीलव्ह आयराला घालतो. नुपूरचं प्रपोज पाहून आयरा भलतीच आनंदात होती आणि ती लगेच त्याला होकार ही देते. त्यानंतर नुपूर तिला अंगठी घालतो.

आयरा खानने देखील नुपूर शिखरे चा हा रोमँटिक लग्न प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. सर्वजण या जोडप्याचा अभिनंदन करत आहेत. आयारा ही अभिनेता आमिर खान याची पहिली पत्नी रीना दत्ता याची मुलगी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version