गोल पोस्ट आरोग्य गरम पाण्यात कॉफीने वजन घटतं? खरं काय ते जाणून घ्या,

गरम पाण्यात कॉफीने वजन घटतं? खरं काय ते जाणून घ्या,

खरं काय ते जाणून घ्या,

Does Drinking Coffee with Hot Water Reduce Weight: “सकाळ झाली की गरम पाण्यात कॉफी! म्हणजे वजन झटक्यात कमी!” – अशी तुमच्याही मनात कल्पना येते का? सोशल मीडियावर आणि मित्रांच्या गप्पांमध्ये वजन कमी करण्याचा हा ‘जादुई’ उपाय नेहमीच चर्चेत असतो. पण खरंच गरम पाण्यात कॉफी टाकून पिणे हा वजन घटवण्यासाठीचा अचूक मार्ग आहे की, ही निव्वळ एक फसवणूक आहे? चला, आज यामागचं सत्य समजून घेऊया.

काय आहे ‘कॉफी’ कनेक्शन?

Close-up of a white coffee cup with steam, a measuring tape, and lemon wedge on a wooden table with a fresh green background, symbolizing weight loss.

कॉफीमध्ये असलेलं कॅफीन शरीरातील चयापचय क्रिया (मेटॅबॉलिझम) वाढवतं, ज्यामुळे शरीर अधिक कॅलरीज वापरतं. सोबत गरम पाण्यामुळे पचन सुधारतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. या दोघांच्या संयोगातून काही प्रमाणात वजन कमी होण्यास मदत होऊ शकते, हे खरं आहे; पण याचा परिणाम खूपच मोजका आणि तात्पुरता असतो. “मी फक्त कॉफी पिऊन बारीक झालो,” असं कुणी सांगत असेल, तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका!

नुसती कॉफी पिऊन वजन कमी होईल का? उत्तर आहे, ‘नाही!’
‘फक्त कॉफी प्या आणि स्लिम व्हा’ ही एक मोठी गैरसमजूत आहे. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आणि पौष्टिक आहार, तसेच पुरेशी झोप हे अत्यंत आवश्यक घटक आहेत. व्यायाम केल्याशिवाय शरीरातील चरबी (फॅट) योग्य प्रकारे वितळत नाही. तुम्ही महागडी कॉफी प्या किंवा कोणत्याही डिटॉक्स डाएटवर राहा, जोपर्यंत तुम्ही शारीरिक हालचाल करत नाही आणि जिभेवर नियंत्रण ठेवत नाही, तोपर्यंत वजन कमी होणे निव्वळ अशक्य आहे.

कॉफी न पिणाऱ्यांसाठी नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय!
जर तुम्हाला कॉफी आवडत नसेल किंवा तिचे दुष्परिणाम टाळायचे असतील, तर वजन कमी करण्यासाठी अनेक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय

उदाहरणार्थ;

  • लसूण, लिंबू आणि कोमट पाणी: सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास चयापचय क्रिया सुधारते.
  • मेथी दाण्याचं पाणी: रात्रभर भिजत घालून सकाळी प्यायल्याने पचन सुधारतं आणि भूक नियंत्रित राहते.
  • डिटॉक्स वॉटर: फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
  • ग्रीन टी: अँटिऑक्सिडंट्सनी भरपूर असल्यामुळे चयापचय वाढवण्यास मदत करते

    हे उपाय केवळ वजन कमी करतात असे नाही, तर ते तुमच्या एकंदर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात.

थोडक्यात, कॉफी हे वजन कमी करण्याच्या प्रवासात केवळ एक पूरक साधन आहे, मुख्य उपाय नाही. वजन कमी करण्यासाठी कोणतीही ‘शॉर्टकट’ पद्धत नसते. त्यासाठी तुमच्या संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे, ‘जादू’च्या मागे न लागता, योग्य आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करा, मग बघा वजन कसं नियंत्रणात येतं!

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version