….आणि शरद पवारांनी सूत्रे हातात घेतली

पुणे : अजित पवार यांनी केलेल्या बंडा नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुत्रं हातात घेतली. आणि चित्र पालटण्यास सुरुवात झाली. राज्याच्या राजकारणात आजवर अनेकदा हे आपल्याला पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला पुन्हा याचा प्रत्यय आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याची खबर धडकली. यामुळे राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांच्या नेतृत्त्वात फुटल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का होता.

त्याचवेळी दरम्यान, शरद पवार यांनी सगळी सुत्रे आपल्या हातात घेतली. शिवसेना आणि काँग्रेसला सोबत असल्याचा विश्वास दिला.अजित पवारांच्या निर्णयासोबत राष्ट्रवादी नसल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले.
दुसरीकडे जे आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते त्यांच्याशी संपर्क करण्यात आला. शरद पवार यांचे प्रयत्न फळाला येत असल्याचं दिसून आलं, एक-एक आमदार अजित पवारांना सोडून राष्ट्रवादीकडे येताना दिसत आहेत. नुकतेच धनंजय मुंडेंही शरद पवारांकडे परत आले आहेत.त्यामुळे आता शरद पवार यांनी पावले उचलायला सुरुवात केली असल्याचे पहायला मिळत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा