आपचे खासदार राघव चड्डा यांना धक्का ! राज्यसभेतून निलंबित

दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ : आपचे राज्यसभेतील खासदार राघव चड्डा यांचे राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली प्रस्तावात फेरफार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे. दिल्ली सेवा विधेयकाबाबत पाच खासदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी आप खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

राघव चड्डा यांच्यावर खासदारांचा समावेश असलेल्या समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव, त्यांच्या मंजूरीशिवाय ठेवल्याचा आरोप आहे. जे नियमांचे उल्लंघन आहे. आता विशेषाधिकार समिती या प्रकरणाची चौकशी करेल, विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत राघव चड्डा राज्यसभेतून निलंबित राहणार आहेत, असेही धनखड यांनी स्पष्ट केले आहे.

विशेषाधिकार समितीचा अहवाल मिळेपर्यंत मी राघव चड्डा यांना राज्यसभा सेवेतून निलंबित करत असल्याचे धनखड यांनी म्हटले आहे. यापूर्वी २४ जुलै २०२३ रोजी आप खासदार संजय सिंह यांचेही केलेले निलंबन कायम राहील. जोपर्यंत विशेषाधिकार समितीच्या शिफारशीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे, असे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा