गोल पोस्ट गुन्हा आप खासदार संजय सिंह यांची “ईडी” अधिकाऱ्यांना मानहानीची नोटीस

आप खासदार संजय सिंह यांची “ईडी” अधिकाऱ्यांना मानहानीची नोटीस

नवी दिल्ली, २३ एप्रिल २०२३: राजधानी दिल्लीतील मध घोटाळ्याच्या आरोपपत्रात चुकीच्या पद्धतीने नाम समाविष्ट केल्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मानहानिची नोटीस बजावली आहे. सिंह यांनी “ईडी” संचालक संजय कुमार मिश्रा तसेच या घोटाळ्याचा तपास करणारे अधिकारी जोगेंद्र यांना ही नोटीस पाठवली आहे.

अधिकाऱ्यांनी ४८ तासांच्या आत माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहावे, असा इशारा नोटीसीमधून सिंह यांनी दिला आहे. मध घोटाळ्याच्या आरोपपत्रात खोट्यापद्धतीने नाव टाकण्यात आले आहे. कुठल्याही साक्षीदाराने आपल्या नावाचा उल्लेख केला नसल्याचा दावा सिंह यांनी केला आहे.

बदनामी करण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र रचण्यात आले असून, यामुळे ईडीने तक्रारीत नावाचा उल्लेख केल्याचे सिंह म्हणाले, त्यामुळे आता नोटीस नंतर अधिकाऱ्यांकडून काय उत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version