सरकारी हेलपाटे थांबणार! आता कॉलेजमध्येच मिळणार ‘आपले सरकार’ सेवा केंद्र

सरकारी कार्यालयांचे हेलपाटे आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवेश आणि शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिनल्हर प्रमाणपत्र आणि इतर १७ प्रकारची महत्त्वाची दाखले विद्यार्थ्यांना थेट कॉलेजमध्ये मिळणार आहेत.

या योजनेचा प्रायोगिक प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी झाला असून, लवकरच पुण्यातील २०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू केली जाणार आहेत. महाविद्यालयांना या केंद्रांसाठी कोणत्याही नवीन गुंतवणुकीची गरज नाही; फक्त उपलब्ध संगणक व इंटरनेट वापरून ही सेवा देता येणार आहे.

प्रत्येक दाखल्यासाठी ५९ रुपये शुल्क आकारले जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाचणार असून, महाविद्यालयीन जीवन अधिक सुलभ होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे