नागपूर १४ डिसेंबर २०२३ : मातंग समाजाच्या मागण्या घेऊन पुणे ते नागपूर असा २६ दिवस पायी प्रवास करत, लहूजी शक्ती सेनेचे विष्णूभाऊ कसबे यांची ‘आरक्षण क्रांती पदयात्रा’ आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन स्थळी नागपुरात पोहोचली. मातंग समाजाचे अ ब क ड वर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वात आज नागपूर मध्ये मोर्चाच्या रुपात पिवळे वादळ दाखल झाले.
२६ दिवसाच्या पायी प्रवासात कसबे यांनी समाज प्रबोधन करत जनजागृती केल्या मुळे देशातील ७ राज्यातून मातंग समाज एकवटला असून आता त्वरित आरक्षणाचे वर्गीकरण करावे यासाठी आम्ही ‘आरक्षण क्रांती पदयात्रेच्या’ माध्यमातुन सरकारवर दबाव आणू असे मत यावेळी कार्यकर्त्यांनी मांडले. या भव्य मोर्चात हजारोंच्या संख्येने मातंग समाजबांधव सहभागी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : रविंद्र खरात