गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई आशिष शेलारांनी घेतली संजय राऊत यांची भेट

आशिष शेलारांनी घेतली संजय राऊत यांची भेट

मुंबई: अचानक प्रकृती बिघडल्याने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आहे. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी लीलावतीमध्ये संजय राऊत यांची भेट घेऊन विचारपूस केली.
तत्पूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची लीलावती रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. राजकारणात मतभेद असले तरी वैयक्तिक नाते जपण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जात असतो. त्यामुळेच आशिष शेलार हे संजय राऊत यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी आशिष शेलार यांच्यासोबत भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेही भेट घेण्यासाठी आले होते.

error: Content is protected !!
Exit mobile version