आता मिळणार ३०० दिवसांपर्यंतच्या रजांचे वेतन

पुणे: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे असलेले अर्जित रजेचे वेतन आता रोख रकमेत मिळणार आहे. निवृत्तीनंतर कीव मृत्यूनंतर शिल्लक असलेल्या अर्जित रजांचे वेतन आता सरकारी कर्मचाऱ्यांना रोख रपनेत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा जीआर मध्ये या विषयी माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वी केवळ २४० रजा नमूद केल्या जात होत्या व बाकीच्या रजा या रद्द केल्या जात होत्या. सातवे वेतन आयोगानुसार आता २४० ऐवजी ३०० दिवसांची राजा खात्यामध्ये ठेवता येणार आहे. जर राज्य सरकारी कर्मचारी निवृत्त झालेले असतील व त्यांच्या रजा ३०० दिवसापर्यंत शिल्लक असतील तर पुढील ३०० दिवसांचे वेतन रोख रकमेत दिले जाणार आहे. तसेच हे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही लागू असणार आहे. या नवीन सुधारणा नुसार कर्मचाऱ्यांना चार ते आठ लाखापर्यंत फायदा होऊ शकतो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा