मुंबई (वृत्तसंस्था): “गर्भनिरोधक” या शब्दाचा उच्चार हा तसा महिलांशी संबंधित शब्द आहे. पण जर पुरूषाकडून यासाठी कंडोमचा वापर केला नाही, तर महिलांनाही नको असलेल्या गर्भ धारणेपासून वाचण्यासाठी गर्भनिरोधकाच्या पर्यायांचा वापर करावा लागतो. यामध्ये महिलांना वेगवेगळ्या पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या असोत, कॉन्ट्रासेप्टीव्ह रिंग लावणे असोत. मात्र यापुढे महिलांना या गोष्टींची गरज भासणार नाही. कारण यापुढे पुरूषही महिलांच्या बरोबरीने ही जबाबदारी पार पडणार आहे. कारण आता पुरषांसाठीही गर्भनिरोधक इंजेक्शन बनवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या बाबत अधिक माहिती मिळाली ती अशी की, या इंजेक्शनची चिकित्सालयीन यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हे इंजेक्शन एकदा घेतल्यानंतर जन्म नियंत्रणासाठीही पध्दत १३ वर्षांपर्यंत प्रभावीरित्या काम करू शकते. हे इंजेक्शन शरीरात एक पॉलिमर सोडेल. ज्यामुळे शुक्राणूला अंडकोषातून बाहेर पडण्यापासून रोखले जाऊ शकते. पुरषांच्या परंपरागत नसबंदीला रोखण्यासाठी या इंजेक्शनला बनवण्यात आले असल्याचे समजते आहे. हे इंजेक्शन इंडियन कौन्सिलऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वैज्ञानिकांनी बनवले आहे. या मेल कॉन्ट्रासेप्टीव्ह इंजेक्शनची तिसरी फेरीची वैद्यकीय चाचणी यशस्वी झाली आहे. हे इंजेक्शन बनविण्याऱ्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, या इंजेक्शनला वैद्यकीय चाचणीमध्ये ३०० रूग्णांना देण्यात आले. यामध्ये त्यांच्यावर कोणताही दुष्परीणाम दिसून आला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या या इंजेक्शनला भारतीय नियामक संस्थेचा परवाना मिळायचा आहे. ज्यामध्ये ६ ते ७ महिन्यांचा अवधी लागणार आहे. हे इंजेक्शन जन्म नियंत्रणासाठी नसबंदीवर पुरूषांसाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.