आठ लोकांच्या जेवणाचे बिल तब्बल ४४ लाख २६ हजार रुपये

https://www.accorhotels.com/9399

सोशल मीडिया सध्या वारंवार कोणत्या तरी हॉटेलचे बिल चर्चेत असते. कधी दोन केळ्यांसाठी हजार रुपये तर उकडलेल्या अंड्यांसाठी अतिरिक्त पैसे घेतल्याचे समोर येते. असाच काहीसा प्रकार चीनच्या शांघाई शहरात येथे समोर आला आहे. येथील एका हॉटेलमध्ये ८ लोकांना डिनरसाठी ४१८,२४५ युआन म्हणजेच ४४ लाख २६ हजार रुपये बिल आकारण्यात आले आहे. या बिलामुळे हे हॉटेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या बिलामधील खास गोष्ट म्हणजे यात केवळ २० फूड मेन्यूचा उल्लेख आहे. केवळ २० पदार्थांसाठी ४४ लाख रुपये आकारण्यात आले. शांघाईच्या मॅगी रेस्त्रांमध्ये दुबईवरून आलेले ८ जण डिनरसाठी आले होते.

सुरूवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हे बिल खोटे असून, फोटोशॉप करण्यात आल्याचे सांगितले. मात्र या हॉटेलचे मालक आणि चीफ शेफ झाओगुओ यांनी मान्य केले की, हे बिल खरे आहे व त्यांनी अती महागडे जेवण सर्व्ह केले.

मॅगी रेस्त्रांचे चीफ शेफ सन झाओगुओ यांच्यानुसार, हा डिनर दुबईवरून आलेल्या एका ग्राहक आणि त्यांच्या मित्रांसाठी तयार करण्यात आला होता. हे जेवण बनविण्यासाठी २०० वर्ष जुन्या सॉल्ट प्लेटचा वापर करण्यात आला आहे.

चीनच्या बाजार नियमांनुसार, हे महागड्या डिनर नियमांचे उल्लंघन आहे. तपास अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये जाऊन चौकशी देखील केली. अद्याप चौकशीचा रिपोर्ट समोर आलेला नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा