गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा आठतास रांगेत उभे राहूनही कुणी ओळखलेच नाही : मीनाक्षी शेषाद्री

आठतास रांगेत उभे राहूनही कुणी ओळखलेच नाही : मीनाक्षी शेषाद्री

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत “दामिनी” म्हणून ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री. त्यांनी अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबत ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु आज पुन्हा एकदा ट्विटमुळे ती चर्चेत आली आहे.

मिनाक्षी अनेक काळापासन सिनेसृष्टीतून दूर राहिली आहे. पण सोशल मीडियावर मिनाक्षी ऍक्टिव आहे. तिने या ट्विटमध्ये म्हटलंय की,’ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी अधिक तास रांगेत उभं राहावं लागलं आहे.’
महत्वाचं म्हणजे मिनाक्षीला या रांगेत कुणीच ओळखलं नाही. त्यामुळे आपला नंबर येईपर्यंत तिला तसंच तात्कळ बसावं लागलं.

मिनाक्षीने तीन फोटो शेअर करत ट्विट केलं आहे. एकात ट्विटमध्ये तिने म्हटलं आहे की,’मी ८ तास रांगेत उभी राहिली आहे. मात्र मला कुणीच ओळखलं नाही.’ मिनाक्षी आपल्या नवऱ्यासोबत अमेरिकेत राहते. हरीश मैसूर यांच्याशी लग्न करून मिनाक्षी अमेरिकेत गेली. आता मिनाक्षी, हरीश आणि दोन मुलं असं यांच कुटूंब आहे.

काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर हे स्वतःच आपल्या ‘दामिनी’ ला ओळखू शकले नव्हते. त्यांनी ट्विट करून कुणी ओळखलं का? असा प्रश्न केला होता. ‘मिस इंडिया’मध्ये निवड झाल्यानंतर मिनाक्षी शेषाद्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘पेंटर बाबू’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. पण जॅकी श्रॉफच्या ‘हिरो’ सिनेमातून ओळख मिळाली. त्यानंतर ‘दामिनी’ सिनेमातून प्रेक्षक प्रभावित झाले होते. मिनाक्षीला दामिनी या नावाने ओळखलं जाऊ लागलं होतं. असेही तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version