लंडन, १९ ऑक्टोबर, २०२२ : लंडनमध्ये एका अनोख्या केकच्या तुकड्याचा लिलाव करण्यात आला. हा केकचा तुकडा होता प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना याच्या लग्नामधला म्हणजेच तब्बल ४१ वर्षापूर्वीचा… ऐकूनच आश्चर्य वाटलं ना!
पण हेच खरं आहे. प्रिन्सेस डायना आणि किंग चार्ल्स यांचा २९ जुलै, १९८१ साली विवाह पार पडला. ज्या विवाहात तब्बल तीन हजार पाहुणे उपस्थित होते. त्या उपस्थितांपैकी एक निगेल रिकेट हे मागच्या वर्षी निधन पावले. त्यांनी जपून ठेवलेल्या ४१ वर्षाच्या जुन्या केकच्या तुकड्याचा लिलाव नुकताच पार पडला. असे न्यूयॉर्कच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
हा लिलाव डोर आणि रीस यांच्यातर्फे खरेदी करण्यात आला. या तुकड्याची लिलावाआधीची किंमत ३०० डॉलर्स अर्थात २७ हजार रुपये ठरवण्यात आली होती. मात्र हा तुकडा १३७५ डॉलर्स अर्थात १,२७,००० रुपयांना विकला गेला. तो खरेदी केला डोर आणि रीस या दांम्पत्याने.
हा केक राजघराण्यातर्फे दिल्या गेलेल्या डब्यात ठेवला गेला होता. त्याचे जतन करणे अत्यंत कठिण काम होते. तसेच त्यानंतर डोर आणि रीस यांनी एक आभारपत्र देखील जाहीर केले. त्यात त्यांनी सांगितले की, माझे आणि डायनाचे संबंध हे शब्दात व्यक्त करता येणार नाही. पण ही भेट नक्कीच खजिना अमूल्य आहे. तो नीट जपला जाईल, या साठी आम्ही प्रयत्नशील राहू.
४१ वर्षानंतरही हा केकचा तुकडा प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या विवाहाचा साक्षीदार आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस