अभाविप पुणे महानगर कार्यकारिणी घोषित!

3

पुणे, 9 ऑक्टोंबर 2021:अभाविप पुणे महानगराची नुतन कार्यकारिणी घोषित , महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. शरद गोस्वामी आणि महानगर मंत्री म्हणून शुभंकर बाचल यांची नियुक्ती!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आपण परिचित आहोतच. विद्यार्थ्यांसाठी दिवसरात्र कार्य करणारी ही परिषद जगातील सर्वात मोठी विद्यार्थी परिषद म्हणून ओळखली जाते. तर, आपल्या कार्यपद्धती साठी ती जगभर प्रसिद्ध आहे. या परिषदेच्या पुणे महानगरातील २०२१- २०२२ या वर्षाच्या कार्यकारिणीची काल दिनांक ८ ऑक्टोबर रोजी लेडी रमाबाई सभागृहात छात्रगर्जना या कार्यक्रमात घोषणा करण्यात आली.

पुणे महानगर अध्यक्ष म्हणून डॉ. शरद गोस्वामी, उपाध्यक्ष म्हणून डॉ. प्रगती ठाकूर, डॉ. संतोष धोत्रे यांची नियुक्ती झाली. तसेच, पुणे शहरातील लाखो विद्यार्थ्यांचे नेतृत्व करण्यासाठी अभाविप पुणे महानगर मंत्री म्हणून शुभंकर बाचल यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच, महानगर सह मंत्री म्हणून शुभम बावचकर, अमोल देशपांडे, स्नेहल जाधव, सोहम नारकर यांची नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये अभाविप चे पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. देवदत्त जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

(सदर वृत्त महानगर कार्यालय मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांची प्रदर्शित केले)

संपर्क.
शुभंकर बाचल
महानगर मंत्री अभाविप पुणे
9764694305

न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा