अभाविप करणार उद्या तीव्र आंदोलन

पुणे, ०९ नोव्हेंबर २०२०: कोविड -१९ च्या महामारीमुळे मार्च २०२० मध्ये संपूर्ण देशात त्वरित लॉकडाउन जाहीर केले गेले. बरेच विद्यार्थी असे होते, जे लॉकडाऊनमुळे अडकले होते. अशाच विद्यार्थ्यांपैकी क्षेत्रीमायूम बोरिश सिंग हा ईशान्य भारताच्या मणिपूर राज्यातील असणारा व पुणे या ठिकाणी IISER मध्ये PhD करणारा विद्यार्थी होता. या कालावधीत बोरिश आजारी पडला व प्रशासनाच्या निष्क्रियतेमूळे २ दिवसानंतर त्यावर उपचार करण्याला सुरूवात झाली व कोविड चा रुग्ण समजून त्याला विलगिकरण कक्षात ऍडमिट करण्यात आले. परंतू, यावेळी त्याच्या रक्त पेशी कमी झाल्या तरीदेखील IISER मधील वैद्यकीय विभागाने बोरिश च्या मूळ आजाराला लक्षात न घेता, त्यावर कॉविड चे उपचार सुरू ठेवले, या हलगर्जीपणामुळे बोरिशला आपला जीव गमवावा लागला.

सरकार करोडो रुपये IISER वर खर्च करत असताना देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कोणतीच काळजी घेताना प्रशासन दिसत नाही. विद्यार्थ्याच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व IISER प्रशासनाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगर उद्या दिनांक १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता IISER डॉ. होमी भाभा रोड, वॉर्ड नं ८,NCL कॉलनी, पाषाण रोड, पुणे येथे तीव्र आंदोलन करणार असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा