उस्मानाबाद, ११ ऑगस्ट २०२० : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धाराशिव शाखा तुळजापूर यांच्यावतीने दिनांक ११ ऑगस्ट रोजी तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर मधील प्राचार्यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की, सध्या कोरोनासारखी वैश्विक महामारीचा फटका सर्व व्यवसाय, व्यापाऱ्यांमध्ये बसला आहे. याचा आर्थिक परिणाम सर्व पालकांना देखील तेवढाच बसला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन मागील सत्रमधील परीक्षा शुल्क परत करण्यात यावी आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रवेश शुल्क ३०% माफ करण्यात यावी. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्यांची प्रवेश प्रक्रिया बाहेर पैसे भरून करण्यात येत आहे. ती लवकरात लवकर थांबवण्यात यावी आणि महाविद्यालय मध्येच प्रवेश प्रक्रिया करून घेण्यात यावी, अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल अस या निवेदनात नमूद केलेले आहे.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, शहरमंत्री पृथ्वीराज महामुनी, सौरभ कदम, शुभम काळे, शुभम छत्रे, गौरव जेवळीकर, लक्ष्मी पाटील सागर गंगणे, आकाश जमदाडे आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड