निकाला बाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचं विद्यापीठात जोरदार आंदोलन

सोलापूर, १६ डिसेंबर २०२०: विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविषयी विद्यापीठास वेळो वेळी निवेदन दिलं,परंतु विद्यापीठाकडून आतापर्यत कसलंही सकारात्मक उत्तर मिळालं नाही. म्हणून, आज दिनांक १६ डिसेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठात कुलगुरूच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आलं.

ज्या विद्यार्थ्यांचे मार्च/एप्रिल २०२० मध्ये फॉर्म भरावयाचे राहिले होते, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म ऑक्टोबर २०२० मध्ये अतिविलंब शुल्कासह नोव्हेंबर २०२० मध्ये परीक्षा घेऊ या आश्वासनावर भरून घेतले. परंतु, डिसेंबर अर्धा संपला अजूनही या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन विद्यापीठाकडं नाही. तरी त्या विद्यार्थ्यांचं अतिविलंब शुल्क परत करावे ही अभाविपची मागणी होती. ज्याला यश आले आहे. त्याचं शुल्क परत करू असे विद्यापीठाने लेखी कळवले आहे.

नुकतेच परीक्षेचे निकाल लागले. ज्यात अनेक विद्यार्थ्यांना समस्या आल्या. निकाल राखीव असणं, अनुउपस्थिती दर्शवणं व अनेकांनी चांगले पेपर देऊन नापास झाल्याच्या तक्रारी अभाविपकडं आल्या होत्या. त्याविषयी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करून देखील त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले नाहीत व विद्यार्थ्यांना छायांकित प्रत मिळावी ही मागणी केली. ज्यावर दिनांक ७ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकात पुनर्मुल्याकन व छायांकित प्रत सुविधा देता येणार नाही, असं विद्यापीठानं नमूद केलं आहे.

परंतु मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाद्वारे (२००७) विद्यापिठाला छायांकित प्रत उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे व ती उपलब्ध त्यांनी करून द्यावी. तसंच, विद्यार्थी समस्या सांगण्यासाठी परीक्षा नियंत्रकांना फोन केले असता एक पण फोन लागत नाहीत व विद्यार्थी गेट वर आला असता त्याला आत सोडल जात नाही. अश्या एक न अनेक समस्यांचं निवारण करण्यासाठी व विद्यार्थी हिताच्या रास्त मागण्या वारंवार विद्यापीठाकडं निवेदनाद्वारे केल्या होत्या. परंतु, विद्यापीठ प्रशासनानं याची योग्य ती दखल न घेतल्यामुळे अभाविपनं विद्यार्थी हिताच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केलं.

फोटोकॉपी च्या मागणीसाठी शेवटी विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या २१ तारखेला याबाबतीत निर्णय घेऊ व तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असं आश्वासन दिल्यामुळं अभाविपनं हे आंदोलन मागं घेतलं. जर तसा निर्णय झाला नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी याहीपेक्षा तीव्र आंदोलन अभाविप करंल. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सोलापूर महानगर मंत्री अनिकेत प्रधाने, पंढरपूर तालुका प्रमुख आनंद भुसनर, जिल्हा संयोजक प्रणव बडगंडी, सोलापूर जिल्हा सह-संयोजक रेवती मुदलियार सृष्टी डांगरे उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा