

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
मूळ भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
तिघांना पुरस्कार : हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर अशी या तिघांची नावं आहेत.
याआधी भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनाही अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.