वैज्ञानिक प्रगतीचे नवे पर्व सुरू
करणारे ‘सर सी. व्ही रमण’
नोबेल पुरस्कार प्राप्त, आघाडीचे शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांची आज जयंती. प्रकाशाचे अंतरंग उलगडण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याबद्दल जाणून घेऊ या.
सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण असे आहे. त्यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात१९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पदवी आणि भौतिकशास्त्राचे सुवर्णपदक मिळवणाऱ्या रामन यांनी वयाच्या १८ व्या वर्षी पहिला संशोधन निबंध प्रसिद्ध केला. तसेच जून १९०७ मध्ये ते असिस्टंट अकाऊंट जनरल म्हणून कोलकत्ता येथे रुजू झाले. एवढ्या उच्च पदाची सरकारी नोकरी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.
१९५२मध्ये त्यांना उपराष्ट्रपती बनण्यासाठी आमंत्रण मिळाले होते. परंतु रमन यांना राजकारणात अजिबात रुची नसल्यामुळे त्यांनी नकार दिला होता.
विशेष कार्य:
● प्रकाश प्रकीर्णन आणि रमन प्रभाव असे अनेक शोध लावून रमन भौतिक शास्त्रात मोठ्या स्थानी पोहचले आहेत.
● १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
● रविंद्रनाथ टागोरांनंतर नोबेल पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय तर पहिले आशियाई ठरले होते.
● विज्ञानक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीमुळे १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराही मिळाला होता.
● १९७५ मध्ये लेनिन शांतता हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.
सर सी.व्ही रमण यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ‘सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते.
चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
भारतातील वैज्ञानिक प्रगतीचे एक नवे पर्व सुरू करणाऱ्या तसेच भारताला महासत्ता बनवण्यामध्ये ही वैज्ञानिक प्रगती महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या महान शास्त्रज्ञाला “न्युज अनकट”कडून विनम्र अभिवादन.