३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पाचवा टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने अभिषेक शर्माच्या तुफानी शतकाच्या जोरावर इंग्लंड संघावर 150 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. त्याने 99 चेंडूत 135 धावांची तुफानी खेळी करत इंग्लिश संघाच्या गोलंदाजांच्या थिल्या उडवल्या. टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मानंतर 37 चेंडूत जलद शतक ठोकणारा अभिषेक हा दूसरा फलंदाज ठरला आहे.
भारतीय संघ नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला.टीम इंडियाने अभिषेक शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर 248 धावांचे मोठे लक्ष इंग्लंडच्या संघापुढे ठेवले होते. या मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना इग्लंड संघाची सुरुवात चांगली राहिली. फिल सॉल्टने मोहम्मद शमीविरूद्ध 2 चौकार आणि 1 षटकारासह वादळी सुरूवात केली. सॉल्टने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. पण त्याला दुसऱ्या स्थानावरून चांगली साथ मिळाली नाही.बेन स्टोक्सला मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर घरचा रस्ता दाखवला अशा चिंताजनक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडचा संघ अवघ्या 97 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंड संघाचा आतापर्यंतचा हा सर्वात वाईट पराभव होता. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने 2 विकेट्स तर मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेत आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
अभिषेक शर्मा पडला इंग्लंड संघावर भारी
अभिषेक शर्मा ज्यावेळी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला तेव्हा चोप्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन यांच्याविरूद्ध त्याने जोरदार फटकेबाजी केली. पॉवरप्लेमध्ये त्याने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या फॉरमॅट मध्ये भारताचे हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. अभिषेक शर्माने 13 षटकार आणि 7 चौकारांच्या जोरावर 135 धावांची शानदार खेळी केली. त्याने 11 व्या षटकात आपले शतक पूर्ण केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर