गजपती (ओडिशा), ०१ ऑगस्ट २०२०: राज्यातील गजपती जिल्ह्यात शुक्रवारी पोलिसांनी १०५६ किलोग्रॅमपेक्षा अधिक गांजा (गांजा) जप्त केला असून दोन जणांना पोलिसांनी अटक केली.
निकिल कुमार आणि अनुराग कुमार असे या दोन आरोपींची नावे आहेत आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जिल्ह्यातील उदयगिरी भागातून उत्तर प्रदेशच्या वाराणसीला जात होते. घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.
कांद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून वाहून नेत असलेल्या सुमारे १०५६ किलो वजनी जप्त केलेल्या गांजाची किंम्मत ही कमीतकमी ५० लाखाची असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी