नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२३ : नवी दिल्ली येथे होणाऱ्या G-20 परिषदेसाठी भारत सज्ज झाला आहे. मात्र या परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. आता यावर परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.
नवी दिल्ली येथे होणाऱ्या G-20 परिषदेसाठी रशियाच्या वतीने परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव तर चीनचे प्रतिनिधित्व पंतप्रधान ली कियांग करणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अनुउपस्थितीत बोलताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, G-20 मध्ये राष्ट्रप्रमुख न येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे अनेक प्रसंग आले आहेत.
यावेळी परराष्ट्रमंत्र्यांना रशिया-युक्रेन युद्धाबाबतही विचारण्यात आले. यावर एस. जयशंकर म्हणाले, “माझ्या मते या परिषदेत सहभागी होणारे देश आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. ते आपली भूमिका माडतील. मात्र परिषदेत कशावर चर्चा होणार यासाठी तुम्हाला प्रतिक्षा करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर